प्रश्नचिन्ह आदिवासी आश्रम शाळा आपले स्वागत करत आहे
प्रश्नचिन्ह आदिवासी शाळेची स्थापना मतीन भोसले व सहकाऱ्यांनी समाजातील प्रत्येक मुलाला शिक्षण,पूर्ण जेवण, वैद्यकीय सेवा व निवारा मिळावा या उद्देशातून २०१२ मध्ये केली.
तसेच महिला सशक्तीकरण व रोजगार या विषयांवर विविध उपक्रम राबविते.
मुलांच्या उज्वल भविष्यासाठी व मानवी अधिकार मिळून देण्यासाठी आश्रम शाळा कार्यरत आहे

भटक्या-विमुक्त जातीतील फासे-पारधी समाज कायमचे भटके जीवन जगणारा, पाली व बेड्यावर वास्तव्य करणारा समाज, जन्मजात गुन्हेगार म्हणून इतर भटक्यांप्रमाणेच फासे-पारधी समाजाकडे बघितले जाते. कुठेही चोरी झाली, कोणताही गुन्हा घडल्यास इतर भटक्यांप्रमाणेच या भटक्यांना पोलिस गुन्हेगार समजतात म्हणूनच समाजाच्या या प्रवृत्तीतून बाहेर काढण्याच्या हेतूनेच मतीन भोसले यांनी अमरावती येथे 'आदिवासी फासेपारधी सुधार समिती' स्थापन केली. फासेपारधी समाजाची सामाजिक, आर्थिक स्थिती अत्यंत दयनीय असल्यामुळे ही जमात समाजाच्या मुख्य प्रवाहापासून कोसो दूर आहेत. अठरा विश्व दारिद्रय, भीषण आर्थिक दैनावस्था, गरीबी, दारिद्रयात व गुन्हेगारी प्रवृत्तीत खितपत पडलेल्या कुटुंबातील भटक्या मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणून त्यांना प्राथमिक शिक्षण देण्याचे विधायक कार्य  संस्था करत आहे. फासेपारधी समाजातील वंचित व दुर्लक्षित बालकांना शिक्षण देण्याच्या हेतूने मतीन भोसले यांचे कार्य विधायक, रचनात्मक व क्रांतिकारी आहे. फासेपारधी समाजातील बालकांना शिक्षण देण्याचा निर्णय महत्त्वाचा असून भोसले यांचे कार्य मैलाचा दगड ठरेल.

मतीन भोसले हा फासेपारधी समाजातील एक शिक्षित तरुण आपल्याप्रमाणेच समाजातील मुलांनी शिक्षण घ्यावे ही त्याची तळमळ. उघडे-नागडे, हातात भिक्षेचा कटोरा घेऊन भीक मागणाऱ्या, चोरी करणाऱ्या लहान मुलांना शिक्षण देऊन त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे ध्येय त्याने उराशी बाळगून 'आदिवासी फासेपारधी सुधार समिती'ची स्थापना करून त्याअंतर्गत भिंती नसलेल्या वर्गखोल्याची शाळा सुरू केली. शिक्षणाच्या हक्कापासून वंचित राहिलेल्या बालकांना स्वतः शिकवायला सुरुवात केली. समाजातील लोकांकडून मदत घेऊन शाळेचे काम सुरू केले. अर्धनग्न बालकांच्या अंगातून कपडे घातले. शाळेसाठी लागणारे शैक्षणिक साहित्य समाजातील मुलांनी 'भीक मांगो' आंदोलनातून उभे करून कधी उघड्यावर तर कधी झोपड्या उभारून वर्ग भरवून त्यांना शिक्षणाचे धडे दिले. मतीन भोसले यांच्या प्रयत्नांनी फासेपारधी मुलांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत .

?
प्रश्नचिन्ह
Upcoming events
'मैत्री मांदियाळी ज्ञान मंदिर' या इमारतीचा लोकार्पण सोहळा